बिगर शेती कर्ज विभागा अंतर्गत विविध योजनेव्दारे करण्यात येणारे कर्जवाटप


1) पगारदार सहकारी पत संस्‍थासाठी कॅश क्रेडीट कर्ज धोरण

     1) बँकेच्‍या पगारदार पतसंस्‍थांना द्यावयाच्‍या कॅश क्रेडीट कर्ज व्‍यवहार वाढवविण्‍यासाठी संस्‍था स्तरावर सभासद कर्जाच्‍या 10% च्‍या वर थकबाकीचे प्रमाण असणा-या संस्‍थांना जास्‍तीत जास्‍त रु.2,50,000/- व 5% ते 10% थकबाकीचे प्रमाण असणा-या संस्‍थांना रु.4,00,000/- आणि 5% पेक्षा कमी थकबाकीचे प्रमाण असणा-या संस्‍थांना रु.12,00,000/- कॅश क्रेडीट कर्ज मर्यादा मंजुर करण्‍यात येते.
     2) संस्‍थेच्‍या पोटनियमातील तरतुदीनुसार सभासदांची वैयक्ति‍क कर्ज मर्यादा या पैकी जी रक्‍कम कमी असेल त्‍या रक्‍कमे पर्यंत सभासद थकबाकी वजा जाता शिल्‍लक रक्‍कमेच्‍या 75% प्रमाणे कॅश क्रेडिट कर्ज मर्यादा मंजूर करण्‍यात येते.
     3) संस्‍थेच्‍या उपविधीतील तरतुदीनुसार सभासदांना वैयक्तिक कर्ज मर्यादा व परतफेडीचे हप्‍ते राहतील.
     4) संस्‍थेच्‍या सभासदाच्‍या 10% भागाच्‍या प्रमाणात व संस्‍थेला 11.50% व्‍याजदराने बॅंक कर्जपुरवठा करीत असते.


2) बँक कर्मचारी कॅश क्रेडिट कर्ज धोरण

     1) कॅश क्रेडिट कर्ज मिळविण्‍यासाठी बँकेच्‍या कायम सेवेमध्‍ये असणारे अधिकारी/ कर्मचारी हे पात्र राह‍तील.
     2) कर्जदार व जामिनदार बँकेचा नाममात्र सभासद असला पाहिजे.
     3) ज्‍या अधिकारी/ कर्मचा-यांना सर्व कपातीनंतर एकूण मिळणा-या पगाराच्‍या 40 % पेक्षा जादा रक्‍कम रोखीने मिळत असेल असेच अधिकारी/ कर्मचारी कर्जपुरवठा करण्‍यात येतो.
     4) बॅंकेच्‍या कर्मचारी व अधि‍का-यांसाठी रु.5,00,000/- ते रु.25,00,000/- पर्यंत कर्ज पुरवठा करण्‍यात येतो. सदर योजनेस 10.50% व्‍याजदराने व्‍याजाची आकारणी करण्‍यात येते.


3) सोने तारण (Gold Loan) कर्ज धोरण

     1. सोने तारण कर्ज बॅंकेच्‍या कार्यक्षेत्रात राहणारे शेतकरी, शेतमजुर, ठेवीदार, सभासद,ग्रामीण कारागीर व मध्‍यमवर्गीय यांना वैयक्‍तिकरीत्‍या देण्‍यात येईल. हे कर्ज घेणा-यास रु.500/- प्रवेश फी भरुन बॅंकेचे नाममात्र सभासद करुन घेण्‍यात येते.
     2. सोने तारण कर्ज (Gold Loan) तालुका स्‍तरावरील शाखेतुन वाटप करण्‍यात येते.
     3. कर्ज घेणा-या व्‍यक्‍तीचे नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंकेत बचत खाते असणे आवश्‍यक राहि‍ल.
     4. अर्जदाराने के.वाय.सी निकषाप्रमाणे संपुर्ण पुर्तता करुन द्यावयाची आहे.
     5. बॅंकेचे कर्मचारी व त्‍यांचे कुंटुबीयांना 9% व्‍याजदराने कर्ज पुरवठा करण्‍यात येतो.
     6. सोने दागि‍न्‍याचे तारण योग्‍य सोने तपासणीस (व्‍हॅल्‍युअर) यांनी निश्‍चि‍त केलेल्‍या किंमतीचे 70% पर्यंत व प्रति केस जास्‍तीत जास्‍त रु.5,00,000/- पर्यंत कर्ज मंजुर करण्‍यात येते.
     7. सदर कर्जावर व्‍याजाचे दर द.सा.द.शे 11% प्रमाणे आकारण्‍यात येईल किंवा वेळोवेळी झालेल्‍या बदलानुसार तसेच शेतकरी सभासदांनी स्‍वतःचे नावाचा नांदेड जिल्‍हयातील 7/12 सादर केल्‍यास त्‍यांना व्‍याजात 2%सवलत देवुन द.सा.द.शे 9%प्रमाणे व्‍याजाची आकारणी करण्‍यात येईल.